Ticker

6/recent/ticker-posts

“जेव्हा तुरुंगाची भीती संपेल,तेव्हा आवाज अधिक बुलंद होईल!”


विद्रोही उत्तम भैया नवगिरे यांची संघर्षाची कविता; अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त

सोलापूर : “तुरुंगाची भीती संपली, की आवाज अधिक बुलंद होतो. माणसाला तुरुंगात बंदिस्त करता येते;मात्र त्याचे विचार कधीच कैद करता येत नाहीत,” असा संघर्षमय संदेश विद्रोही उत्तम भैया नवगिरे यांनी आपल्या कवितेतून दिला आहे.

“जेव्हा तुरुंगाची भीती संपेल…” या शीर्षकाच्या कवितेत त्यांनी समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या निर्धाराचे चित्रण केले आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या माणसाला कितीही संकटांना सामोरे जावे लागले, तरी त्याचा संघर्ष आणि विचारांची मशाल विझत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.



कवितेत तुरुंगातील काळोख्या कोठडीचे प्रतीक वापरताना, “विचारांचा सूर्य मावळत नाही आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची मशाल कधी विझत नाही,” असा संदेश देण्यात आला आहे.

तसेच तुरुंगातील कैद्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत, “आम्ही सत्तेला घाबरत नाही; तुरुंगाच्या दरवाज्याच्या सळ्या तुटल्या आहेत,आधी त्या दुरुस्त करा,” असा उपरोधिक सवाल कवितेतून उपस्थित करण्यात आला आहे.





तुरुंगाच्या सळ्या तुटलेल्या असतील, तर त्या केवळ भौतिक व्यवस्थेतील त्रुटी नसून व्यवस्थेतील प्रश्नांकडेही लक्ष वेधणारे प्रतीक असल्याचे कवितेच्या आशयातून दिसून येते. शेवटी “माणूस बंदिस्त होऊ शकतो,पण विचारांना कधीच कैद करता येत नाही,” या भूमिकेतून विद्रोही उत्तम भैया नवगिरे यांनी आपला संघर्षाचा संदेश अधोरेखित केला आहे.
— विद्रोही उत्तम भैया नवगिरे