Ticker

6/recent/ticker-posts

नान्नज येथे छत्रपती ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न


६२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’चा दिला सामाजिक संदेश

सोलापूर : मानाचा नरसिंह गणेशोत्सव मंडळ,नान्नज यांच्या वतीने तसेच छत्रपती ग्रुप, नान्नज यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी नरसिंह मंदिर,नान्नज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,एकूण ६२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताच्या तुटवड्यामुळे कोणाच्याही उपचारात अडथळा निर्माण होऊ नये, या सामाजिक उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील युवक,नागरिक तसेच विविध स्तरांतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली.



रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे मंडळ व आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून ‘रक्तदान हेच जीवनदान’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

यावेळी माजी सरपंच दिलीप बप्पा माने,ज्ञानेश्वर भोसले, काशिनाथ आवताडे,छत्रपती ग्रुपचे संस्थापक सागर माने, मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल सुतार,उपाध्यक्ष गणेश गुरव,मिलिंद गवळी,ॲड.वैभव बोंगे,विकास सुतार,अजय बोंगे, रमेश सुतार,विष्णू मुळे,नितीन गुरव,प्रविण गुरव,मनोज सुतार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,स्वयंसेवक, रक्तदाते तसेच ग्रामस्थ यांचे मानाचा नरसिंह गणेशोत्सव मंडळ व छत्रपती ग्रुप,नान्नज यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

“रक्तदान करा,जीवन वाचवा” या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नान्नजमध्ये सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक आदर्श निर्माण झाला.