Ticker

6/recent/ticker-posts

राऊत-सोपलांचा अर्ज रद्द.....?

राऊत-सोपलांचा अर्ज रद्द करण्याची मागणी,निवडणूक आयोगाकडे गंभीर त्रुटी बाबत उमेदवार - मतदार यांची तक्रार

सोलापूर : दि३१ (एमडी२४न्यूज) बार्शी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत आणि दिलीप गंगाधर सोपल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात गंभीर माहिती लपविल्याची आक्षेप उमेदवार अर्ज भरलेले आकाश दळवी व मोहसीन तांबोळी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी निवडणूक अधिकारी गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 


तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की,राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी शपथपत्रामध्ये खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती नमूद केली आहे. शपथपत्रात खोटी माहिती नमूद करणे अशी अनेक माहिती लपवली आहे. आकाश दळवी,मोहसीन तांबोळी आणि दिनानाथ काटकर यांनी राऊत यांच्या शपथपत्रातील अनेक माहिती लपलेली त्याबाबतचे आवश्यक पुरावे तक्रारीसोबत सादर केले आहेत. राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी तक्रारी मध्ये करण्यात आली आहे. शपथपत्रामध्ये  न्यायालय खटला क्रमांक, बँक खात्याचे नंबर,बंदपत्रे / ऋणपत्रे शेअर्स म्युच्युअल फंडचा युनिटचा तपशील, उत्पन्नाचा स्तोत्राचा तपशिलात आमदाराचे मानधन व भत्ता,आदमासे चालू बाजार किंमत,प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एमडी असलेले राजेंद्र राऊत यांनी प्रायव्हेट कंपनीचे शासनाला देय असलेले रक्कम, ७०० कोटी रुपायापर्यंत अँटी करप्शन ब्युरो येथे इन्क्वायरी चालू असून तसे उच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत हस्तक्षेप केलेली,महागडे मोबाईल घेतले असलेली जंगम मालमत्ता,विविध सहकारी संस्था शेअर्सचे युनिट याचा संपूर्ण तपशील या सर्व माहिती लपवल्या असून अशा गंभीर त्रुटी तक्रारी मध्ये नमूद आहे.





तर दिलीप सोपल यांच्या विरोधात उमेदवार असलेले आकाश दळवी आणि मोहसीन तांबोळी व मतदार असलेले दिनानाथ काटकर यांनी बंदपत्रे/ऋणपत्रे शेअर्स म्युच्युअल फंडचा युनिटचा तपशील आणि महागडे मोबाईल घेतले असलेली जंगम मालमत्ता याची माहिती लपवल्याची तक्रार दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी याप्रकरणी काय निर्णय घेतात,याकडे बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.