मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर : दि.३१ (एमडी२४न्यूज) सोलापूर जिल्हयातील विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत उद्योग,उर्जा,कामगार व खनिकर्म विभाग,मंत्रालय मुंबई यांचे दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी च्या परीपत्रकान्वये कळविले आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी दोन तासाची सवलत हि उद्योग,उर्जा,कामगार व खनिकर्म विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना,कारखाने दुकाने इत्यादीना लागू राहील.
सोलापूर विधानसभा सार्वत्रीक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हयातील खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना,निवासी हॉटेल,खाद्यगृहे नाटय गृहे व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या,शॉपिंग सेंटर,मॉल्स,रिटेलर्स इत्यादीना सुचना देण्यात येत आहे कि,दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी.
जर अपवादात्मक परिस्थितीत उत्पादन प्रक्रीयेतील कारखाना सुरु ठेवून मतदानासाठी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असून त्यांच्या परवानगीनेच दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबधित अस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी आवाहन केले आहे.