इफ्तार कार्यक्रमातूनही समाजात बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य होतं अधिक दृढ : मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम
सोलापूर : “धर्म, जात आणि पंथ वेगवेगळे असले तरी आपण सर्वजण कर्मचारी जिल्हा परिषद या नात्यानं एकाच कुटुंबाचा भाग आहोत. अशा कार्यक्रमांमुळे समाजात बंधुभाव, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते, असं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात सांगितले.
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुस्लिम कर्मचारी बांधवांसाठी गुरुवारी सायंकाळी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
या इफ्तार सोहळ्यास सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील,जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,शिक्षण अधिकारी (प्राथमिक) कादर शेख,कार्यकारी अभियंता बांधकाम नरेंद्र खराडे,संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थित होती.
मराठा सेवा संघ,शाखा जिल्हा परिषद यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.” या शब्दात उल्लेख करताना,मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी रमजाननिमित्त रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या.
इफ्तारच्या वेळी सर्व अधिकारी-कर्मचारी एकत्र येऊन रमजान महिन्याच्या पवित्रतेचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा,परस्पर सन्मान आणि एकात्मतेचा जणू सुंदर संदेश देण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे,सचिन साळुंखे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे,दिनेश बनसोडे,प्रदीप सगट,संतोष माने, निलेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास चेळेकर,सुधाकर माने-देशमुख,सुर्यकांत मोहिते,सचिन चव्हाण,चेतन भोसले,आनंद साठे,विकास भांगे,रणजित गव्हाणे,संतोष शिंदे,अनिल पाटील,वासुदेव घाडगे,विशाल घोगरे,अभिजीत निचळ,संतोष सातपुते,भूषण काळे,उमेश खंडागळे,प्रकाश शेंडगे,मनोज साठे,गोपाल शिंदे,संजय पाटील,रविंद्र शेंडगे,महेंद्र माने, सुभाष तनमोर,शशि साळुंखे,विठ्ठल मलपे,संतोष शेळके, नितिन पाटील आदी पदाधिकारी आणि ममता काशेट्टी, वैशाली रंपुरे,श्रीमती शशिकला सुतार,गौरी कदम,ज्योती माळी,ज्योत्स्ना साठे,कृष्णा अधटराव,सिद्धेश्वर जक्का,शुभम खरे,सत्यजित कमळे,रोहित शिंदे,सागर शेंडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषद सोलापूर येथे आयोजित केलेला इफ्तार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केलं तर अविनाश गोडसे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
