Ticker

6/recent/ticker-posts

भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला; दोन महिला आरोपी जेरबंद...


अक्कलकोट बसस्थानकातील भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला; दोन महिला आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १५.४५० ग्रॅम सोन्याचे दोन मंगळसूत्रांसह २ लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : अक्कलकोट बसस्थानकावर प्रवासी व भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत दाग-दागिने चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून १५ ग्रॅम ४५० मिली वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र, बाजारभावाप्रमाणे एकूण २ लाख २७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जबरी चोरी,घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांना पंढरपूर व अक्कलकोट येथील बसस्थानकांवर भाविकांच्या दाग-दागिन्यांची व रोख रकमेची होणारी चोरी शोधण्याचे आदेश देण्यात आले होते.



गोपनीय माहितीवरून दोघींना ताब्यात - दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी अक्कलकोट उपविभागातील कुंभारी टोलनाका येथे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अक्कलकोट बसस्थानकावर प्रवासी चढत असताना चोरी करणाऱ्या दोन महिला सध्या कुंभारी बसस्थानकावर थांबलेल्या आहेत. 
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुंभारी बसस्थानकावर रवाना झाले. तेथे वर्णनाप्रमाणे दोन संशयित महिला आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आले.





कौशल्यपूर्ण तपासादरम्यान दोन्ही महिलांनी जुलै व ऑगस्ट २०२६ दरम्यान अक्कलकोट बसस्थानकावर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिलेख तपासल्यानंतर त्यांच्या सहभागाचे दोन गुन्हे निष्पन्न झाले.
अ.क्र. पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. व कलम 
१) अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु.र.नं. ४१८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२)
२) अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु.र.नं. ४४९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) दोन मंगळसूत्रे हस्तगत
तपासात गु.र.नं. ४१८/२०२६ मधील चोरीच्या मुद्देमालापैकी १० ग्रॅम ४५० मिली वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, बाजारभावाप्रमाणे अंदाजे १ लाख ५२ हजार रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले.

तसेच गु.र.नं. ४४९/२०२६ मधील चोरीच्या मुद्देमालापैकी ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, बाजारभावाप्रमाणे अंदाजे ७५ हजार २०० रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले.

अशाप्रकारे एकूण १५ ग्रॅम ४५० मिली वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे २ लाख २७ हजार २०० रुपये किमतीचे, आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहेत.



अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी - ) चंद्रकला नितीन कांबळे (वय ३० वर्षे) रालक्ष्मी माता मंदिर, लिंबेवाडी,सोलापूर. २) नंदा नागनाथ पाथरे (वय ६५ वर्षे) रा. लक्ष्मी माता मंदिर, लिंबेवाडी,कावळा गल्ली, सोलापूर.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप,स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहा.पोलीस निरीक्षक संजय राठोड,पोलीस हवालदार सलीम बागवान,हरीदास पांढरे,विरेश कलशेट्टी, व्यंकटेश मोरे,जगदीश राठोड,पोलीस कॉन्स्टेबल कपिल काटकर,योगेश जाधव,सुनील पवार,महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव व सुनंदा झळके यांनी सहभाग घेतला.