Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेविका शेख यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची दखल


नगरसेविका वाहिदा कासिम शेख यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची दखल

सोलापूर : एआयएमआयएमच्या नगरसेविका तथा सोलापूर महानगरपालिकेच्या एमआयएम गटनेत्या वाहिदा कासिम शेख उर्फ भंडाले, प्रभाग क्रमांक १४ यांच्याविरोधात दाखल तक्रारीची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार आज,दि. ८ सप्टेंबर मंगळवार रोजी पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले सोलापूर येथे उपस्थित असताना त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित तक्रार तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या आदेशाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.





यावेळी संबंधित प्रकरणासंदर्भातील पत्र व निवेदन विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले. दरम्यान,विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सदर प्रकरणाची दखल घेत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून,प्रकरणात नियमानुसार पुढील आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

त्यामुळे नगरसेविका वाहिदा कासिम शेख यांच्याविरोधातील तक्रारीवर आता प्रशासनाकडून नियमानुसार कोणती कारवाई केली जाते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.