Ticker

6/recent/ticker-posts

कॅन्सरग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा मदतीचा हात; १ लाख ५० हजारांचा धनादेश सुपूर्द


सोलापूर : गंभीर कर्करोगाशी झुंज देत असलेले शिक्षक आयु. लखन कांबळे यांच्या उपचारासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला.

कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेच्या पदाधिकारी,सदस्य तसेच विविध मान्यवरांनी आर्थिक सहकार्य केले. या सहकार्यामुळे लखन कांबळे व त्यांच्या कुटुंबाला उपचाराच्या कठीण काळात मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मा. अवचिल महाडिक साहेब यांच्या उपस्थितीत तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे सर यांच्या हस्ते लखन कांबळे यांना १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.



यावेळी बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे,शहर प्रमुख पवन कांबळे,जिल्हा सचिव सोमलिंग कोळी,दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष श्रीरंग बनसोडे,सचिव बाबुराव गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण बनसोडे सर यांच्यासह संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.





माणुसकीच्या भावनेतून मदतीचे आवाहन - “सेवेची भावना आणि संकटात माणुसकी” या ब्रीदाला अनुसरून कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केलेल्या आवाहनाला सर्वांनी संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला. संकटाच्या काळात गरजू व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
लखन कांबळे यांच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे,शिक्षक बांधवांचे,संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

“आपली मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, एका गरजू कुटुंबाला या कठीण प्रसंगी आधार देणारी आहे. आपल्या दातृत्वामुळे आणि संवेदनशीलतेमुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे,” अशी भावना संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
लखन कांबळे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे,यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.