Ticker

6/recent/ticker-posts

अंध दाम्पत्याची संघर्षमय जीवनयात्रा थांबली; रियाज शेख यांचे अल्प आजाराने निधन


सोलापूर : (निधन वार्ता) सोलापूर शहरातील नवीन विडी घरकुल परिसरातील परिचित रियाज हाजीअली शेख यांचे शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रियाज हाजीअली शेख आणि त्यांच्या पत्नी दोघेही अंध होते. परिस्थितीशी संघर्ष करत हे अंध दाम्पत्य शहरातील विविध भागांत एकत्रितपणे भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. प्रतिकूल परिस्थितीतही दोघांनी एकमेकांना साथ देत जीवनाचा संघर्ष सुरू ठेवला होता.
रियाज यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ते नवीन विडी घरकुल,८५ येथे राहत होते.

त्यांच्या निधनानंतर राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. जडेसाब कब्रस्तान येथे मुस्लिम धार्मिक रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी नातेवाईक,मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

रियाज हाजीअली शेख यांच्या पश्चात अंध पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून,परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.