सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे ११ महिन्यांच्या कालावधी करिता बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदांची भरती; १० सप्टेंबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
सोलापूर : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,सोलापूर विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सोलापूर या दोन कार्यालयांसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून विनानिविदा दरपत्रके मागविण्यात आली आहेत.
पदांचा तपशील पुढीलप्रमाणे -
१. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,सोलापूर :
• शिपाई - ३ पदे
• पात्रता : १२ वी पास
• मानधन : २१,५६६ रुपये
२. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर :
• लिपिक - १ पद
• पात्रता : पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक
• मानधन : १४,००० रुपये
• संगणक परिचर - १ पद
• पात्रता : पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक
• मानधन : १४,००० रुपये
• मैदान सेवक - ४ पदे
• पात्रता : ४ थी पास
• मानधन : १२,००० रुपये
• सुरक्षा रक्षक सेवक - १ पद
• पात्रता : ४ थी पास
• मानधन : १२,००० रुपये
या पदांसाठी सेवा पुरविण्यास इच्छुक व पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक व इच्छापत्रासह परिपूर्ण प्रस्ताव दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,पार्क चौक,नॉर्थकोर्ट मैदान, सोलापूर येथे प्रत्यक्ष किंवा दुरध्वनी क्रमांक ०२१७-२९९२९५६ वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संगीता खंदारे यांनी केले आहे.
