Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा प्राणी क्लेष सोसायटी च्या अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी विविध क्षेत्रातील इच्छूक व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर : सोलापूर जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या (SPCA) व्यवस्थापकीय समितीवरील 10 ते 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी खालील चार क्षेत्रातील इच्छुकांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सोलापूर जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी,सोलापूर यांच्या नांवे पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल जोडून संपुर्ण माहितीसह परिपुर्ण प्रस्ताव दिनांक 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत पाठवावेत.


 
सोलापूर जिल्हयातील गोशाळा/पांजरापोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष. 
१) सोलापूर जिल्हयातील प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे 2 सदस्य.
२) सोलापूर जिल्हयातील SPCA शासन सदस्य सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या 2 व्यक्ती.
३) सोलापूर जिल्हयातील मानवहितकारक कार्य करणारे प्राणी कल्याणासाठी काम करणारे 5 ते 6 कार्यकर्ते.


कृपया, आपले अर्ज जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय,नेहरु नगर,विजापूर रोड,सोलापूर - 413004 या कार्यालयाकडील डॉ.डी.ए.गिड्डे,मो.नं. 9309131647 ई-मेल आयडी- ddcahsolapur@gmail.com, यांच्याकडे दिनांक 15 ऑक्टोबर 2026  पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावेत. असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पंशुसंवर्धन डॉ.अनिल तांबे यांनी केले आहे.