Ticker

6/recent/ticker-posts

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक मंगळवारी


पुणे : विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवारी गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्याने मंगळवार १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे सदस्य सचिव तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कळविले आहे.



प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो,असेही सरदेशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.