Ticker

6/recent/ticker-posts

“अखेर पाठपुराव्याला यश! मोनाली विधाते यांच्यावर गुन्हा दाखल; सुनीता काळे यांच्या नेतृत्वाचा दणका”

सक्षम महिला कल्याणकारी संस्थेच्या पाठपुराव्याला यश; मोनाली विधाते यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

सुनीता काळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अंधश्रद्धेविरोधातील लढ्याला मोठे यश

पुणे : श्रमिक पत्रकार संघ येथे सक्षम महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने 11 सप्टेंबर शुक्रवार रोजी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली. संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर स्वयंघोषित गुरु आई मोनाली ताई विधाते यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईसाठी संस्थेच्या टीमच्या प्रमुख सुनीता काळे यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने संबंधित प्रकरणातील माहिती व पुरावे संकलित करून पोलिस तसेच प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.





संस्थेच्या दाव्यानुसार, धार्मिक भावनेच्या नावाखाली फसवणूक केल्यासह इतर गंभीर आरोपांप्रकरणी मोनाली विधाते यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,या आरोपांबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.



पत्रकार परिषदेत बोलताना सुनीता काळे म्हणाल्या, “महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आमचा लढा सुरूच राहील.”

या पत्रकार परिषदेला सुनीता काळे, संस्थापक-अध्यक्ष माधुरी गायकवाड,नेहा खान,पन्ना कोडीतकर,प्रिती धोत्रे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.