सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन (SEDA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) महेश भवन येथे उत्साहात पार पडली. या सभेत विविध शासकीय व समाजसेवी संस्थांवरील निवड व नेमणुका बिनविरोध झाल्याबद्दल सेडा व इलेक्ट्रोचे संस्थापक अध्यक्ष केतन शहा यांचा सन्मान करण्यात आले.
यावेळी सेडा चे अध्यक्ष सूरजरतन धूत,सचिव हरीश कुकरेजा आणि सहसचिव गिरीश मुंदडा यांच्या हस्ते केतन शहा यांचा सत्कार करण्यात आले.
सभेदरम्यान संस्थेच्या विविध उपक्रमांवर तसेच आगामी काळातील सामाजिक व संघटनात्मक कार्याबाबत चर्चा करण्यात आली. सेडा च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांच्या हितासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आले.
