Ticker

6/recent/ticker-posts

गणपती उत्सवाला समाजसेवेची जोड; छावा संघटनेतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम


सोलापूर : धामणगाव (दु.), ता.बार्शी येथे छावा संघटनेच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली.

पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांना देशी वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. 



यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बदली झाली तरी पुन्हा धामणगाव येथे येऊन लावलेल्या वृक्षांची फळे खाण्याची इच्छा असल्याचे सांगत पोलीस निरीक्षक कादबाने यांनी उपस्थितांना  वृक्षलागवडीसह त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. तसेच सकाळी १० वाजता आरोग्य तपासणी व विविध रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.



या कार्यक्रमास वैराग पोलीस स्टेशनचे कर्मचारी गणेश चव्हाण,पोलीस पाटील गणेश मसाळ,आरोग्य सेवक डॉ. संगेकर,आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते केशव जगताप,प्रशांत देशमुख,योगेश देशमुख,हर्ष कदम,नितीन गाडे,दादा देशमुख,डॉ.निखील मसाळ,भैय्या सावळकर, बबलू देशमुख,फयाज बागवान,प्रथमेश देशमुख, करण देशमुख,शंभुराजे देशमुख यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य,पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत छावा संघटनेने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले.