Ticker

6/recent/ticker-posts

शिरवळ येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न



सोलापूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक व लोकभिमुख आरोग्यसेवा मिळाव्यात. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ तालुका अक्कलकोट येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात पार पडले  

ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा व  यंत्रणा अधिक सक्षम बळकटीकरण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश कोपरवाड तसेच प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे डॉ.सुहास कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय प्रशिक्षण उत्सहात पार पडले.



या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले यामध्ये 1) गरोदरपणातील प्रसुती अंतर्गत व प्रसुती पक्षात काळजी 2) नवजात शिशु आणि अर्भकाच्या आरोग्यसेवा 3) बालक व किशोरावस्थातील आरोग्यसेवा 4) कुटुंब नियोजन व गर्भनिरोधक सेवा 5) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि संसर्गिक आजाराचे व्यवस्थापन 6) सामान्य संसर्गित व किरकोळ आजाराचे व्यवस्थापन  7) अससर्गजन्य आजाराची छाननी व प्रतिबंधात्मक  8) डोळे व कान समस्यांचे प्राथमिक काळजी 9)  मौखिक आरोग्याची मूलभूत काळजी 10)  वर्धापकाळातील आणि वेदनाशक काळजी 11) तात्कालीन वैदकीय सेवा (Emergency Care) 12) मानसिक आरोग्य व समुपदेशन 13) योग व आयुष्य उपचार पद्धतीचा अवलंब 14) नेतृत्व गुण संवाद कौशल्य महिलांचे आरोग्य व पुरुषांचा सहभाग या सर्व आरोग्य सेवा विषयाचा सहभाग होता. 
     


यावेळी  सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा (CPHC )  अंतर्गत प्रतिबंधात्मक व उपचारत्मक सेवा तसेच आरोग्य संस्थेचे गुणवत्ता कशी वाढावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या अद्यावत ज्ञान व कौशल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. प्रशिक्षण दरम्यान अतिरिक्त जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ नंदकिशोर घाडगे, तालुका आरोग्याधिकारी डॉ.अश्विन करजखेडे वैदकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी डॉ.रोहन वायचळ प्रशिक्षक  तथा वैद्यकीय अधिकारी डॉ शिवलीला माळी आरोग्य सहायिका कलावती चव्हाण वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पाटील डॉ.शबनम शेख जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे शाखा सदस्य रफिक शेख आरोग्य कर्मचारी समुदय आरोग्य अधिकारी व आशा कर्मचारी बहुसंख्याने उपस्थित होते.