Ticker

6/recent/ticker-posts

रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गणेश आरती; शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव


सोलापूर : महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने दैनिक सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अस्मिता व्हिजन न्यूज चॅनेल येथे श्री गणेशाची आरती करण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या तसेच अस्मिता व्हिजनच्या संपादिका अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी अस्मिता ताई गायकवाड आणि जिल्हा संघटिका प्रिया बसवंती यांनी दैनिक सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



यावेळी अस्मिता व्हिजनच्या संचालिका डॉ.गौरी परिस गायकवाड,ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती,शहर संघटिका प्रीती नायर, उपजिल्हा संघटिका सुनीता लोंढे,उपशहर संघटिका मीना सुरवसे,चंदाराणी जाधव,पूजा शिंदे,महानंदा आंबलगी,मोनोरा बँकेच्या असिस्टंट मॅनेजर रूपाली काळंगे,लक्ष्मी माशाळ यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



यावेळी MPSC व UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गणेश आरती,शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक व धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.