सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील नागरिकांची SIR अंतर्गत विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत तातडीने नोंदणी करण्यात यावी,अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सध्या देशभरात SIR अंतर्गत मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण सुरू असून प्रशासकीय यंत्रणा आणि BLO यांच्या माध्यमातून मतदार नोंदणीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र,सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी समाजातील अनेक नागरिकांची नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी समाजबांधवांनी माझी नगरसेविका चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेतन माजी नगरसेविका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेय यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सोलापूर जिल्हा SIR प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कसेकर यांना बोलावून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (VC) जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,प्रांताधिकारी आणि BLO यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक तालुका,शहर तसेच वाडी-वस्त्यांवर जाऊन आदिवासी पारधी समाजातील पात्र नागरिकांची SIR अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले.
यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील एकही पात्र मतदार SIR मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही,अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेय तसेच जिल्हा SIR प्रमुख उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिल्याचे माझी नगरसेविका चव्हाण यांनी एमडी२४न्यूजशी बोलताना म्हणाले
यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश सचिव नकुल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे यांच्यासह समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आदिवासी पारधी समाजाच्या मतदार नोंदणीसंदर्भातील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रशासनाने तत्काळ दखल घेतल्याने समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
