Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हाध्यक्षपदी बसवराज दिंडोरे; शहराध्यक्षपदी चनबसप्पा गुरुभेट्टी, कार्याध्यक्षपदी सिद्धाराम तांबुळे

बसवकल्याण क्षेत्र समितीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी बसवराज दिंडोरे; शहराध्यक्षपदी चनबसप्पा गुरुभेट्टी, कार्याध्यक्षपदी सिद्धाराम तांबुळे

छत्रपती संभाजीनगर : बसवकल्याण क्षेत्र समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोलापूर जिल्हाध्यक्षपदी बसवराज दिंडोरे, सोलापूर शहराध्यक्षपदी चनबसप्पा गुरुभेट्टी आणि शहर कार्याध्यक्षपदी सिद्धाराम तांबुळे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे उपस्थित पदाधिकारी व समाजबांधवांनी स्वागत करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

क्रांती चौक येथील उन्नती हॉटेल अँड लॉन्स येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉ. अमरनाथ सोलपुरे होते. बैठकीस प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर (लातूर), प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे (सोलापूर), प्रदेश सचिव प्रा. शेषराव शेटे (नांदेड), प्रा. सुनील हेंगणे, प्रा. राजेश विभुते, प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगे, सचिन संगशेट्टी, गणेश वैद्य, नूतन जिल्हाध्यक्ष सचिन खैरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे, बबलू सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




बैठकीत बसव भारत उत्सव २०२७, नूतन अनुभव मंटप, बसवकल्याण क्षेत्र विकास उपक्रम, तसेच समाजातील धार्मिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध पदांवरील नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार, समाज संघटन आणि बसवकल्याण क्षेत्राशी संबंधित उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्हा व शहरातील समितीच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांवर समाजाच्या विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.