Ticker

6/recent/ticker-posts

स्व.मोहम्मद रफी व मोहम्मद अजीज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘यादों की महफिल’ ऑकेस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन


सोलापूर : सरगम स्टुडिओतर्फे ३० जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात रंगणार संगीताची मैफल

सोलापूर : संगीतप्रेमींसाठी एक खास पर्वणी म्हणून स्वर्गीय मोहम्मद रफी आणि स्वर्गीय मोहम्मद अजीज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरगम स्टुडिओतर्फे ‘यादों की महफिल’ ऑकेस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार,दि. ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक स्व. मोहम्मद रफी आणि स्व.मोहम्मद अजीज यांनी गायलेली सदाबहार व लोकप्रिय गीते सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या हिंदी गीतांचे चाहते आणि संगीत रसिकांसाठी ही मैफल विशेष आकर्षण ठरणार आहे.





कार्यक्रमाचे संयोजन आरीफ एलाल यांनी केले असून मॅनेजमेंटची जबाबदारी बब्बी हुमनाबादकर यांच्याकडे आहे. कार्यक्रमात आरीफ एलाल,ऐजाज खलीफा, अनिता अय्यर, लता राज, वर्षा घोडके, इम्रान अली, मुस्तकीम एलाल, बाबर कोरबो, राजकुमार कोकलकी आणि अशोक मैंदर्गी हे गायक सहभागी होणार आहेत.


या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. ट्रॅकच्या माध्यमातून लोकप्रिय गीते सादर करून रसिकांना स्व. मोहम्मद रफी आणि मोहम्मद अजीज यांच्या सुरेल आठवणींमध्ये रमण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमास सुधीर खरटमल आणि नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.



सोलापूर शहरातील सर्व संगीतप्रेमी,रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘यादों की महफिल’ कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन आयोजक आरीफ एलाल यांनी केले आहे.

कार्यक्रमाची माहिती
कार्यक्रम : ‘यादों की महफिल’ ऑकेस्ट्रा
आयोजक : सरगम स्टुडिओ
दिनांक : गुरुवार, ३० जुलै २०२६
वेळ : सायंकाळी ७.०० वाजता
स्थळ : हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
प्रवेश : सर्वांसाठी विनामूल्य
संयोजन : आरीफ एलाल
मॅनेजमेंट : बब्बी हुमनाबादकर