Ticker

6/recent/ticker-posts

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण


सोलापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ,सावित्रीबाई फुले यांच्यासह राष्ट्र पुरुषांवरील पोवाडयाने हुतात्मा स्मृती मंदिरचा रंगमंच दणाणून गेला.

प्रारंभी या कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक करून शाहिरी महोत्सवाच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती दिली संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नऊ शाहिरांची ओळख आणि त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला याप्रसंगी कवी मारुती कटकधोंड,जितेश कुलकर्णी,विजय दादा साळुंखे अविनाश महागावकर,प्रशांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.


शाहीर गणेश गलांडे,शाहिरा संगीता हेमंतराजे मावळे,शाहीर राजेंद्र कांबळे या शाहीरांनी आपली कला सादर करीत राष्ट्रपुरुषावरील पोवाड्याचे गायन केला. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या सहकार्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा अफजल खान वध आपल्या पोवाडातून मांडून हुतात्मा स्मृती मंदिरात रोमांच उभे केले. तर शाहिरा प्रा.संगीता मावळे यांनी लोक कलेवरील पोवाडा सादर केला.



तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस होता तर बुधवारी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोल धाबळे यांनी केले.