Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा व सत्र न्यायाधीश वैद्य यांना भावपूर्ण निरोप


जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राज वैद्य यांना भावपूर्ण निरोप

सोलापूर : सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राज वैद्य यांची बदली झाल्याने जिल्हा सरकारी वकील कार्यालय,सोलापूर यांच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात न्यायालयीन अधिकारी, सरकारी वकील,विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी न्यायमूर्ती वैद्य यांच्या कार्यकाळातील न्यायनिष्ठा,कार्यक्षम प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतील योगदानाचा गौरव केला. सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.



निरोप समारंभात विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना वैद्य यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात न्यायमूर्ती प्रशांत राज वैद्य यांनी सोलापूरमधील सहकारी अधिकारी,वकील आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांच्या शुभेच्छांसह उत्साहपूर्ण वातावरणात झाला.