उत्तम नवगिरे यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस आयुक्तांकडे धाव
सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम नवगिरे यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर तसेच पोलीस आयुक्त,सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती देताना नवगिरे यांनी म्हणाले की,केवळ लाच देणे किंवा घेणे एवढाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्राचा विषय नसून,शासकीय पदाचा गैरवापर करणे हेदेखील गंभीर बाब असून त्यासंदर्भात कलम १९७ अन्वये तक्रार नोंदविण्यात आली आहे.
नवगिरे म्हणाले की,या मोहिमेअंतर्गत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या विरोधात पुराव्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी भेट दिल्यानंतर आणखी पुरावे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच,त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मोदी पोलीस चौकी येथे पीएसआय यांनी त्यांना बोलावून जबाब नोंदवून घेतल्याची माहितीही नवगिरे यांनी दिली.
या तक्रारीमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
