सोलापूर मध्ये दोन्ही ब्रिगेड एकत्र येत लवकरच आनंद उत्सव साजरा करणार.
सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यानात बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची स्थापना करण्यात आली या आनंद उत्सव कार्यक्रमात दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्रित आल्याची घोषणा मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे यांनी युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत केली.
यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड राजकीय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे मराठा सेवा संघाचे महासचिव सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे विजय घोगरे नवनाथ घाडगे विकास पासलकर मधुकर मेहकर गंगाधर बनबरे राजेंद्र कोंढारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे महाराष्ट्रात दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्रपणे येऊन लढा देणार असून लवकरच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष व मराठा सेवा संघाचे 33 कक्ष व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय व चर्चा झाली असून लवकरच सोलापूर शहरात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहाने आनंद उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांनी माहिती दिली.
