नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राज्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प, अभियानांची प्रगती आणि आगामी योजनांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिली.
भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणारे सहकार्य आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंची गाठेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
