Ticker

6/recent/ticker-posts

१७० वर्षांचा विश्वास; डिजिटल इंडिया घडवण्यात इंडिया पोस्टची दमदार भरारी


नवी दिल्ली : देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह टपाल सेवा असलेल्या इंडियन पोस्ट ने डिजिटल युगातही आपली ताकद सिद्ध करत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. डिजिटल सेवांचा विस्तार,वेगवान लॉजिस्टिक्स नेटवर्क,पार्सल सेवांतील वाढ आणि जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे इंडिया पोस्ट नव्या भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

इंडिया पोस्टने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ₹१५,३७३ कोटींचा विक्रमी महसूल प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात महसुलात ₹२,१०० कोटींची ऐतिहासिक वाढ झाली असून,ही वाढ मागील सरासरीपेक्षा जवळपास दहापट अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
पार्सल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही इंडिया पोस्टने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ई-कॉमर्स आणि डिजिटल वितरण व्यवस्थेला चालना देत पार्सल व लॉजिस्टिक्स सेवांमध्ये सुमारे ७० टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह सेवा पुरवण्यात इंडिया पोस्ट आघाडीवर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.



डिजिटल इंडिया अभियानाला बळकटी देत इंडिया पोस्टने नागरिकांसाठी विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यातही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

१७० वर्षांचा विश्वास जपत इंडिया पोस्ट आता आधुनिक तंत्रज्ञान,डिजिटल सेवा आणि मजबूत नेटवर्कच्या जोरावर नव्या भारताच्या प्रगतीला नवी दिशा देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.