नवी दिल्ली : ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण तसेच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या,शेतीमालाला मिळणारा दर, निर्यात,साठवणूक,प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी हिताच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री,वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
