सोलापूर : मराठा सेवा संघ व वधू-वर परिचय कक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा ३२वा मेळावा रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी सिध्देश्वर पेठ येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुला-मुलींचे विवाह जुळविणे पालकांसाठी अधिक आव्हानात्मक बनले आहे. ही गरज लक्षात घेऊन मराठा सेवा संघ व वधू-वर परिचय कक्षाच्या माध्यमातून दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात वधू-वरांची नोंदणी करून त्यांचे बायोडाटा वाचन केले जाते. तसेच उपस्थित वधू-वरांना स्वतःचा परिचय करून देण्याची संधी दिली जाते.
मेळाव्यात नोंदणी केलेल्या सर्व वधू-वरांची माहिती असलेली पुस्तिका तयार करून उपस्थितांना मोफत वितरित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य समाजबांधवांना विवाह जुळविण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मेळाव्याचा जास्तीत जास्त समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, महानगराध्यक्ष सूर्यकांत पाटील, वधू-वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष अंबादास सपकाळे, शहराध्यक्ष राम माने, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननवरे आणि जिल्हा सचिव लक्ष्मण महाडिक यांनी केले आहे.
मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव, प्रिती कदम, राजू व्यवहारे, आर. पी. पाटील, दत्ता जाधव, अभिजली जाधव, वासुदेव घाटगे, अजित सगरे, नागनाथ कदम, परशुराम पवार, गोवर्धन गुंड यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
