सोलापूर : सोलापूर महानगरपालिका मंडई विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंडई परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक व संविधान निर्मितीतील योगदानाची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी मंडई अधीक्षक मल्लिनाथ तोडकर,खाजाप्पा कट्टीमणी,आंबादास तळभंडारे,आबासाहेब डोंगरे,उमेश गायकवाड,अक्षय बंडगर,पुजारी,बसवराज पाटील,संतोष माळी,नितीश लोंढे,दादासाहेब कंटेनवरू,मनोज बुरानपुरे, सुनील लोणार,शिवाजी हलकवडे,संजय जावळे,सिद्राम येरदाळे,बाबू गजधाने यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व समाजातील समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
