मानवता फाऊंडेशन ने केली मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कडे मागणी.
अक्कलकोट : सध्या तापमानात भरपूर वाढ होत असून व तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून अक्कलकोट शहरात नगरपालिके मार्फत अक्कलकोट शहर परिसरात पाणपोई सुरू करण्यात यावी.
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकोट शहरात जागोजागी थंड पिण्याचे पाण्याची पाणपोई सुरू करण्यात यावी अशी मागणी मानवता फाऊंडेशन च्या वतीने मुख्याधिकारी रमाकांत डाके साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली.
अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मानवता फाऊंडेशन चे सोहेल फरास यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी सांगितले की,अक्कलकोट नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके साहेब यांना मानवता फाऊंडेशन च्या वतीने निवेदन देण्यात आले आणि अक्कलकोट शहरात पाणपोई सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
सध्या तापमानात भरपूर वाढ होत असून अक्कलकोट शहरात नगरपालिके मार्फत अक्कलकोट शहर परिसरात पाणपोई सुरू करण्यात यावी. अशी आमची मागणी आहे असेही सोहेल फरास यांनी सांगितले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानात मोठी वाढ झाली आहे या काळात प्रवासी, भक्त, वयोवृद्ध,अबाल बालक,विद्यार्थी कामगार आणि सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे.
सद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जनतेत मोठा उत्साह पसरला आहे जनता या निमित्ताने सर्वत्र फिरत असतात अशा वेळी त्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे ही अडचण लक्षात घेऊन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून अक्कलकोट येथे स्वामी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे अक्कलकोट शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याची पानपोईची सोय सुरू करावी जेणेकरून अक्कलकोट शहरवासीयांना व भक्तांना तसेच सर्व नागरिकांना दिलासा मिळेल.
नागरिकांना पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा फायदा होईल आणि आपले सहकार्य मोलाचे ठरेल. असे ही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास,ज्योतिबा पारखे, रशीद खिस्तके,सैपन शेख,महम्मद शिकलगार,अशरफ गोलंदाज,महिबुब अन्सारी,हर्षवर्धन देडे यांच्यासह अक्कलकोट येथील अनेक रहिवासी उपस्थित होते.
