Ticker

6/recent/ticker-posts

मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून नुसत सर लढ म्हणा !


खाकीतीला गारवा!

सोलापूर : वैराग येथील लोडोळे ताःबार्शी येथील बाबूराव दगडू पवार यांच्या घराला विद्युत तारेच्या ठिणग्या उडून लागलेल्या आगीत गॅसच्या टाकिचा भडका उडुन संसार जळून खाक झाला मात्र जिवीत हानी झाली नाही. एक गुंठा ही जमीन नसणाऱ्या ह्या शेतमजुराचे कुटुंब उघड्यावर आले.

खूप नुकसान झालं संसार मोडून पडला -  ही घटना समजताच या कुटुंबाला वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. कोरडा सल्ला न देता दहा हजार रुपये मदत दिली शिवाय संसारोपयोगी साहित्य दिले. घाबरु नका हताश होऊ नका असं सांगून गावातील लोकांना मदतीची हाक दिली काही अडचण आली तर सांगा असे म्हणाले.

दुष्काळ असो महापुर असो - वृक्ष वल्ली  रक्तदान चळवळ् व्यसन मुक्ती एखादी वाईट घटणा 'गुन्हा घडायच्या आत प्रतिबंध.

गुन्हेगारांच मतपरिवर्तन - जाडी टनक खाकी वर्दीच्या आत रेशमाच मऊ कापड असल्याचा प्रत्यय वैराग परिसरातील जनतेला येत आहे यासमई पोलीस पाटील अमोल गुंड मधुकर गुंड. सुधाकर पाटील अशोक गुंड अविनाश गिराम समाधान पाटील शिवाजी जाधव प्रकाश शिंदे लक्ष्मण पवार नितीन गुंड बलभीम गुंड ग्रामस्थ पोलीस कर्मचारी उपस्थित होते वैराग परिसरात पोलीस निरिक्षक गावडे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या दानशूरपणाचे कौतुक होत आहे.