Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती; शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


सोलापूर : (सैफन शेख)  भारतीय जनता पक्ष च्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयात आज उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 






सोलापूर शहराच्या भाजपच्या पंधराव्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.





यावेळी आमदार देवेन्द्र कोठे,महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील नगरसेवक, नगरसेविका,मंडळ अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. मान्यवरांनी पक्षाची विचारसरणी,संघटनशक्ती आणि देशाच्या विकासात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 


दरम्यान,या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले. पक्षाच्या स्थापनेपासून योगदान देत ४६ व्या वर्धापन दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी आमदारांची अनुपस्थिती का होती,याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असून,कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली असून,पक्षांतर्गत समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.