Ticker

6/recent/ticker-posts

भाजपचा ४६ वर्षांचा टप्पा : राष्ट्रीय उभारणीसह सोलापूरची वाढती ताकद...


भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला पक्ष आज सत्तेच्या केंद्रस्थानी.

४६ वर्षांत भाजपची वाटचाल : विचारसरणीपासून विकासराजकारणापर्यंत.

दिल्ली ते सोलापूर : भाजपच्या ४६ वर्षांच्या विस्ताराची ठळक नोंद.


सोलापूर : (सैफन शेख)  भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रवासाचा आढावा घेताना राष्ट्रीय ते स्थानिक स्तरापर्यंतचा भक्कम पाया आणि सातत्याने वाढत गेलेली संघटनात्मक ताकद स्पष्टपणे दिसून येते. देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या भाजपचा हा प्रवास प्रेरणादायी ठरतो.

भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० साली झाली आणि पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच भाजपने देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे अटल बिहारी वाजपेयी हेच देशाचे पहिले भाजपाचे पंतप्रधान बनले आणि त्यांनी विकासाभिमुख व स्थिर शासनाची नवी दिशा दिली.





महाराष्ट्रातही भाजपचा प्रवास तितकाच संघर्षमय आणि यशस्वी राहिला आहे. राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी संघटन बांधणीसाठी मोठे योगदान दिले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना पक्षाला जनाधार मिळवून दिला. पुढे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी राज्यात पारदर्शक व विकासकेंद्रित प्रशासनाची ओळख निर्माण केली.



सोलापूर शहरातही भाजपचा प्रवास हळूहळू रुजत गेला आणि आज तो मजबूत झाला आहे. शहराचे पहिले भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून वकील गजानन बसय्या हंपी यांनी संघटन उभारणीसाठी मोठे योगदान दिले. सोलापूर शहर पुलोदचे पहिले महापौर किशोर देशपांडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व दिले. तसेच लिंगराज वल्याळ यांनी सोलापूरचे पहिले आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत भाजपची ताकद वाढवली.

सोलापूर जिल्ह्यात भाजपाच्या वतीने पहिले पालकमंत्री म्हणून जगन्नाथ पाटील यांनी काम पाहिले, तर शहराच्या पहिल्या महिला महापौर म्हणून शोभा बनशेट्टी यांनी महिला नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला. या सर्व नेत्यांच्या योगदानामुळे सोलापूरमध्ये भाजपची मुळे अधिक भक्कम झाली.




आज भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून विचारसरणी,संघटनशक्ती आणि विकासाची दिशा देणारा एक व्यापक आंदोलन बनला आहे. देशभरात आणि महाराष्ट्रात भाजपने केलेली प्रगती ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आणि नेतृत्वाच्या दूरदृष्टीचे फलित आहे.

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा! आगामी काळातही पक्षाने विकास,सुशासन आणि राष्ट्रहिताच्या दिशेने आपला प्रवास अधिक वेगाने पुढे न्यायला हवा,हीच अपेक्षा.