Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला


सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.

    
यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील,प्रांत अधिकारी सुमित शिंदे,तहसीलदार निलेश पाटील,पंढरपूर चे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


     
राज्य शासनाच्या ०२ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.यांची नियुक्ती झाली आहे.