Ticker

6/recent/ticker-posts

लिपिक वर्ग संघटनाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गोडसे यांची निवड


लिपिक वर्गीय संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक सोलापूरमध्ये संपन्न.

अविनाश गोडसे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी संवाद बैठक १२ एप्रिल रविवार रोजी सोलापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत लिपिकांच्या पदोन्नती टप्प्यांमध्ये कपात करून त्यांना वर्ग-१ पर्यंतचे वेतन मिळवून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर आणि राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी लिपिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मार्गदर्शन केले. लिपिकांच्या वेतन त्रुटीचा मुद्दा उपस्थित करताना,राज्याध्यक्षांनी स्पष्ट केले की,तांत्रिक संवर्गाशी तुलना करण्याऐवजी राज्य शासनातील लिपिकांशी तुलना केल्यास मागण्यांना अधिक बळ मिळू शकते.



संघटनेने शासनाकडे चार पदोन्नती टप्प्यांऐवजी दोन टप्प्यांची रचना लागू करण्याची मागणी केली असून,मंजूर पदसंख्या कमी न करता वाढवण्याचीही भूमिका मांडली आहे.

यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती देण्यात आले. कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव लवकरच पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच वरिष्ठ सहाय्यक लिपिक आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदे एकत्र करण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आले.



बैठकीपूर्वी दिवंगत लिपिक नेते विवेक लिंगराज,सयाजी बागल व विशाल उंबरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.

बैठकीनंतर सोलापूर जिल्हा लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे यांची बहुमताने निवड करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याध्यक्ष सागर बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश काळे यांनी केले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.