सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत धार्मिक स्थळांवरील तब्बल ९३८ अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.
जिल्ह्यातील विविध मंदिर आणि मशिदींवर नियमांचे उल्लंघन करून बसवण्यात आलेल्या भोंग्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मंदिरांवरील ५८१ आणि मशिदींवरील ३५७ अशा एकूण ९३८ भोंग्यांचा समावेश आहे.
या मोहिमेचे विशेष म्हणजे संपूर्ण कारवाई अत्यंत नियोजनबद्ध आणि शांततेत पार पडली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही समाजातील नागरिकांनी कायद्याचा आदर ठेवत पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. तसेच, संबंधित धर्मस्थळांचे पदाधिकारी व विश्वस्तांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे मोहीम सुरळीत पूर्ण झाली.
या उपक्रमामुळे जिल्ह्यात ध्वनीप्रदूषण नियंत्रणास मोठी मदत होणार असून सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहिमेत सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले असून, भविष्यातही कायद्याचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
