सोलापूर : नागपूर येथे झालेल्या जाहीर व्याख्यानात बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात विविध मराठा संघटनांनी तीव्र आंदोलन केले. मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे एकत्र येत जाहीर निषेध नोंदवण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी संबंधित व्यक्तीविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही,असा इशाराही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या निषेध आंदोलनात सोलापूर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.जी.के.देशमुख,शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे,तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष साळुंखे मॅडम,जिल्हा कार्याध्यक्ष अभिंजली जाधव,स्वाती पवार,लता ढेरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच लक्ष्मण महाडिक,जीवन यादव,राजू व्यवहारे,लिंबराज जाधव,परशुराम पवार,राम माने,दत्ता जाधव,नितीन जाधव, नलवडे साहेब,सचिन चव्हाण,राजू डोंगरे,रमेश जाधव,राजेंद्र भोसले,बिराजदार,राहुल जाधव,पलक जाधव,गजानन साळुंखे,राहुल भुसारे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली.
