Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा परिवाराच्या वतीने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' कार्यशाळेचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाच्या (भा.ज.प.) वतीने देशभरात राबवण्यात येणाऱ्या 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' अभियानांतर्गत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागांची कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर येथील भाजप विभागीय पक्ष कार्यालयात पार पडली. या कार्यशाळेला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेतील प्रमुख मुद्दा होता 'राष्ट्रसेवा सर्वोपरि'. यावेळी भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले गेले. 'याच समर्पणभावनेतून भाजपा परिवाराचे संघटन दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे,' असे मत कार्यशाळेच्या आयोजनाच्या वेळी व्यक्त करण्यात आले. कार्यशाळेतील उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि दिशा मिळत असल्याचेही सांगण्यात आले.



कार्यशाळेला मंत्री अतुलजी सावे,प्रदेश सरचिटणीस राजेश देशपांडे,प्रदेश सरचिटणीस सुनील राणे,आमदार संजय केनेकर,आमदार अनुराधाताई चव्हाण,आमदार नारायण कुचे, माजी खासदार डॉ.भागवत कराड,माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' अंतर्गत कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे - लोकसेवा,पक्षीय कार्यप्रणाली व संघटनात्मक शक्ती वाढवणे. यामुळे भाजपाची भविष्यातील दिशा अधिक स्पष्ट आणि संघटित होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.