Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेतील विशेष सात समिती सदस्यांची नियुक्ती जाहीर


सोलापूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २० एप्रिल सोमवारी विविध सात विशेष समिती सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षीय बलाबलनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या. 

महिला व बालकल्याण समिती,मंड्यान नि उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती,विधी समिती,शहर सुधारणा समिती,स्थापत्य समिती,वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती अशी या सात समित्यांची नावे आहेत. प्रत्येक समितीमध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलनुसार प्रत्येक समितीमध्ये सत्ताधारी भाजपला आठ तर प्रमुख विरोधी पक्ष एमआयएमला एक जागा मिळाली आहे. महापालिकेच्या सभेत नियुक्त झालेल्या ज्या विविध समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

 
महिला व बालकल्याण समिती - सुनिता कामाठी, मंदाकिनी तोडकरी, वंदना गायकवाड, मृण्मयी गवळी, पूजा वाडेकर, श्वेता खरात, सुमन चाबुकस्वार, निर्मला जंगम, सफिया चौधरी.

 मंड्या आणि उद्यान समिती सदस्य - अर्चना वडनाल, पूनम काशीद, स्वाती बडगु, शिवानंद पाटील, किसन जाधव, संगीता शिवाजी जाधव, विजया खरात, गौतम कसबे, अनिसा मोगल.


कामगार व समाज कल्याण समिती  - श्रीदेवी फुलारे, राजेश्री धोडमनी , सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, मीनाक्षी कडगंची,  समाधान आवळे, श्रद्धा पवार, बसवराज केंगनाळकर,  वहिदाबानो शेख.

विधी समिती - प्रशांत पल्ली,  नारायण बनसोडे, व्यंकटेश कोंडी, दीपिका यलदंडी, राजश्री कणके, चैत्राली गायकवाड, सत्यजित वाघमोडे, सारिका खजूरगी, अकिला भागानगरी.

 शहर सुधारणा समिती  - सात्विक बडवे, मधुसूदन जंगम, अंबिका गायकवाड, संजय कोळी, स्वाती बडगु, उज्वला दासरी, बबीता धुम्मा, कविता गज्जम, अजरोद्दीन जहागीरदार.





 स्थापत्य समिती - वैभव हत्तुरे, विनायक विटकर, विजय चिप्पा, अजय पोन्नम, मेघनाथ येमूल, विनोद भोसले, दीपक जमादार, रवी कय्यावाले, तौफिक हत्तुरे.
 
वैद्यकीय सहाय्य  व आरोग्य समिती - किरण देशमुख, मंजिरी किल्लेदार, गीता गवई, वनिता पाटील, युवराज सरवदे, प्रवीण दर्गोपाटील, आरती वाकसे,सुनील खटके, अकिला भागानगरी.

अशी माहिती माध्यमासमोर सभागृहा नेते नरेंद्र काळे यांच्यावतीने देण्यात आले,यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम उपस्थित होते.