Ticker

6/recent/ticker-posts

तडीपार व्यक्ती मतदान करण्याकरता आपल्या हद्दीत येऊ शकतो पोलिसाचं परवानगी



सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुक मतदान करण्याकरीता तडीपार कालावधीत असलेल्या इसमांना सोलापूर शहरात येण्याकरीता परवानगी देण्यात येत आहे.





विजय कबाडे,पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांनी दिनांक १५ जानेवारी गुरुवार रोजी तडीपार कालावधीत असलेल्या इसमांना सोलापूर महानगरपालिका निवडणुक २०२५-२६ चे मतदान करण्याकरीता दि.१५/०१/२०२६ गुरुवार रोजीचे सकाळी ०८.०० वा. ते दुपारी १२.०० वा. पर्यंत सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६२ टिप ३,पोट कलम (२) अन्वये अटी व शर्तीवर हजर राहण्याची परवानगी दिलेली आहे. 





तडीपार कालावधीत असलेल्या इसमांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता सदरची परवानगी दिली आहे.