Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद सोलापूर येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिन साजरा


सोलापूर : सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते ७७ व्या ध्वजवंदन सोलापूर जिल्हा परिषदेत भारत देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आले. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पुजन करून ध्वज वंदन करणेत आले. 





जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे,सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायती सुर्यंकात भुजबळ,कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संतोष नवले, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप,शिक्षणाधिकारी कादर शेख,कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सप्ताळे, गटविकास अधिकारी यांचे सह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.





या प्रसंगी सिंईओ कुलदीप जंगम यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी हरीभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर केले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ दिली. 

जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम व अभिज्ञा किरण ठोके या बालिकेच्या हस्ते हवेत तिरंगा रंगाचे फुगे सोडून  उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा दिल्या. आणि जिल्हा परिषद मुख्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख,कक्ष अधिकारी अविनाश गोडसे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार मेहताब शेख यांनी केले.