केतन महेंद्र शहा यांना “ज्ञानर्षी–कर्मयोगी ग.प्र.प्रधान मास्तर पुरस्कार” प्रदान
अहिल्यानगर : भारतीय जैन संघटना,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन महेंद्र शहा यांना त्यांच्या उद्योग,व्यापार,शिक्षण, सामाजिक कार्य,गोसेवा व विकासात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वर्ष २०२५-२६चा प्रतिष्ठित “ज्ञानर्षी-कर्मयोगी ग.प्र.प्रधान मास्तर पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील “स्नेहालय” संस्थेच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सदर पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सन्मानाचे स्वरूप : सन्मानपत्र,रुपये 11,000/- चा धनादेश व भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमात ११ वी सदभावना सायकल यात्रेचा समारोप देखील पार पडला. सदर कार्यक्रमाचे प्रायोजन प्राणीमित्र विलासभाई शहा यांनी केले होते. या प्रसंगी सोलापूर येथून विजय रामचंद्र यादव,विजय जाधव,अॅड.दत्तात्रेय अंबूरे व शुभम साठे यांची विशेष उपस्थिती लाभली. केतन शहा हे भगवान महावीरांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून संवेदनशीलता,विनम्रता व संयम यांचा सुंदर संगम साधत समाजोपयोगी कार्य करत आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होत असून हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती आहे,असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
आज देखील २९ संस्थे मध्ये ते ऑनररी सेवा देत आहेत,ह्या आगोदर राज्य शासना तर्फे कोविड योद्धा,महानगर पालिका व सिनियर सिटीझन तफे सोलापूर रत्न,जैन सोशल ग्रुप तर्फे जैन भूषण,रयत शिक्षण तर्फे रयत पुरस्कार अशी अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले आहे.
या सन्मानाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील सामाजिक व सेवाभावी कार्यासाठी त्यांना सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.
