सोलापूर : हत्तुरे वस्ती येथील अराईज इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने २६ जानेवारी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत टी.एस.फाऊंडेशनचे अध्यक्ष तौसीफ शेख यांच्या हस्ते झेंडा वंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक अश्विनी कांबळे व कर्मचारी, पालक उपस्थित होते. याप्रसंगी नागेश हत्तुरे,रुद्राप्पा कांबळे, लक्ष्मण किणीकर,गंगाधर कांबळे,गणेश धोकटे,श्रीशैल पॅडशिंगे,संदेश हत्तुरे,ओंकार हत्तुरे,सिद्धार्थ हत्तुरे,ऋतुजा हत्तुरे, सोमनाथ मकनापुरे,झंपा उपस्थित होते.
