Ticker

6/recent/ticker-posts

श्रीवास्तव नाभिक समाज सेवा प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


सोलापूर : श्रीवास्तव नाभिक समाज युवा-महिला सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. 
लष्कर भागातील समाजाच्या नूतन मंदिर-कार्यालय परिसरात हा सोहळा पार पडला.





​लष्कर येथे समाजाचे हक्काचे मंदिर आणि कार्यालय उभे करण्यासाठी सर्व समाजबांधवांसह मोलाचे योगदान देणारे गोवर्धन कोडपाक आणि राजकुमार मालतुमकर यांना यावर्षीच्या पहिल्या ध्वजारोहणाचा बहुमान देण्यात आला. 
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि समाजाचे थोर स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव मालतुमकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा साधना हिरापूरकर आणि युवा अध्यक्ष विशाल मालतुमकर यांनी भूषविले.




या सोहळ्यासाठी किशोर मालतुमकर,भाग्यवान म्यकलवार, युवराज मालतुमकर,सतिश मालतुमकर,रवीप्रकाश मालतुमकर,आकाश मालतुमकर,किशोर कोडपाक,शुभम कोडपाक,योगेश मॅकलवार,हर्ष मॅकलवार,शैलाकाकू मालतुमकर,वनिताताई मालतुमकर,रेखा मालतुमकर,  श्रावणी मालतमकर,नागवेणीताई भरतनूर,शांताबाई भरनूर,  सारिकताई मायकवार,जयश्री मायकवार,मधुबाई मायकलवार,पूजा मायकलवार,कलावतीताई हिरापुरे, विनिताताई मायकलवार व समाजातील आबालवृद्धांची लक्षणीय उपस्थिती होती.