सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतमोजणी प्रक्रिया आज अत्यंत शांततेत,पारदर्शक व सुरळीत पार पडली. शहरातील विविध ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त,सीसीटीव्ही निरीक्षण तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी करण्यात आली.
या निवडणुकीसाठी एकूण २६ प्रभागांकरिता मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. शहरातील १०९१ मतदान केंद्रांवर एकूण ९,२४,७०६ मतदानापैकी ४९०२७६ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी पुरुष मतदानाने - २४८८९४ तर महिला मतदाराने - २४१३२९. व तसेच तृतीयपंथी १३६ पैकी ५३ तृतीयपंथीने आपले मतदानाचा अधिकार बजावले.
मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निहाय ७ ठिकाणी स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व ठिकाणी अग्निशमन व्यवस्था,सीसीटीव्ही कॅमेरे,तसेच आवश्यक प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ७ अंतर्गत निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सदर प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पार पाडण्यात आली. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ या निवडणूक करता एकूण ५६४ उमेदवार रिंगणात होते.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे -
भारतीय जनता पार्टी - ८७ विजयी
शिवसेना,शिंदे गट - ०४ विजयी
राष्ट्रवादी,अजित पवार - ०१ विजयी
नॅशनल काँग्रेस - ०२ विजयी
ए आय एम आय एम - ०८ विजयी
एकूण. - १०२ विजयी
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी
(प्रभाग - उमेदवाराचे पूर्ण नाव - पक्ष)
प्रभाग - ०१
०१ अ - गौतम मधुकर कसबे भाजप
०१ ब - राजश्री अंबादास कणके - भाजप
०१ क – पूनम प्रभाकर काशीद – भाजप
०१ ड - अविनाश महादेव पाटील - भाजप
प्रभाग - ०२
०२ अ - नारायण दत्तात्रय बनसोडे - भाजप
०२ ब - कल्पना ज्ञानेश्वर कारभारी - भाजप
०२ क - शालन शंकर शिंदे – भाजप
०२ ड - किरण विजयकुमार देशमुख - भाजप
प्रभाग - ०३
०३ अ - राजकुमार पाटील - भाजप
०३ ब - स्वाती दत्तात्रय बडगु - भाजप
०३ क - रंजिता सकलेश चाकोते - भाजप
०३ ड - संजय बसप्पा कोळी - भाजप
प्रभाग - ०४
०४ अ - वंदना अजित गायकवाड - भाजप
०४ ब - विनायक फकीर विटकर - भाजप
०४ क - ऐश्वर्या गणेश साखरे - भाजप
०४ ड - अनंत ज्ञानेश्वर जाधव - भाजप
प्रभाग - ०५
०५ अ - समाधान रेवणसिद्ध आवळे - भाजप
०५ ब - अलका आनंद भवर - भाजप
०५ क - मंदाकिनी तोडकरी - भाजप
०५ ड - बिज्जू संगप्पा प्रधाने - भाजप
प्रभाग - ०६
०६ अ - सोनाली अर्जुन गायकवाड - भाजप
०६ ब - सुनील पांडुरंग खटके - भाजप
०६ क - मृण्मयी महादेव गवळी - भाजप
०६ ड - गणेश प्रकाश वानकर - भाजप
प्रभाग - ०७
०७ अ - अनिकेत पिसे - शिवसेना (शिंदे)
०७ ब - श्रद्धा किरण पवार - भाजप
०७ क - मनोरमा सपाटे - शिवसेना (शिंदे)
०७ ड - अमोल शिंदे - शिवसेना (शिंदे)
प्रभाग - ०८
०८ अ - अमर मारुतीराव पुदाले - भाजप
०८ ब - गीता गोविंद गवई - भाजप
०८ क - बबिता अनंतकुमार धुम्मा- भाजप
०८ ड - गौरीशंकर उर्फ प्रवीण काशिनाथ दर्गोपाटील - भाजप
प्रभाग - ०९
०९ अ - शेखर पांडुरंग इगे - भाजप
०९ ब - कादंबरी प्रकाश मंजेली - भाजप
०९ क - पूजा श्रीकांत वाडेकर - भाजप
०९ ड - मेघनाथ दत्तात्रय येमूल - भाजप
प्रभाग - १०
१० अ उज्वला अविनाश दासरी - भाजप
१० ब - दीपिका वासुदेव यलदंडी - भाजप
१० क - सतीश नागनाथ शिरसिल्ला -भाजप
१० ड - प्रथमेश महेश कोठे - भाजप
प्रभाग - ११
११ अ - युवराज कोंडीबा सरवदे - भाजप
११ ब - शारदाबाई विजय रामपुरे - भाजप
११ क - मीनाक्षी दत्तात्रय कडगंची - भाजप
११ ड - अजय चंद्रकांत पोन्नम - भाजप
प्रभाग १२
१२ अ - सिद्धेश्वर रामलू कमटम - भाजप
१२ ब - सारिका सिद्धाराम खजुर्गी - भाजप
१२ क - अर्चना राजू वडनाल - भाजप
१२ ड - विनायक रामकृष्ण कोंड्याल - भाजप
प्रभाग १३
१३ अ - सुनिता सुनील कामाठी - भाजप
१३ ब - अंबिका हनमंतू चौगुले - भाजप
१३ क - सत्यनारायण रामय्या गुर्रम - भाजप
१३ ड - विजय भूमय्या चिप्पा - भाजप
प्रभाग १४ (एम आयएम)
१४ अ - अकीला भागानगरी - एमआयएम
१४ ब - असिफ अहमद शेख एमआयएम
१४ क -वाहिदाबानो शेख - एमआयएम
१४ ड - तौफिक हत्तूरे - एमआयएम
प्रभाग १५
१५ अ - श्रीदेवी जॉन फुलारे - भाजप
१५ ब विजया नागेश खरात - भाजप
१५ क - विनोद धर्मा भोसले - भाजप
१५ ड - चेतन नरोटे - काँग्रेस
प्रभाग १६
१६ अ - नरसिंह असादे - काँग्रेस
१६ ब - श्वेता प्रशांत खरात - भाजप
१६ क - कल्पना संतोष कदम - भाजप
१६ ड - प्रियदर्शन साठे - शिवसेना (शिंदे)
प्रभाग १७
१७ अ - निर्मला हरीश जंगम - भाजप
१७ ब - भरतसिंग विठ्ठलसिंग बडूरवाले - भाजप
१७ क - जुगनुबाई अंबेवाले - भाजप
१७ ड - रवी शंकरसिंग कैयावाले - भाजप
प्रभाग १८
१८ अ - श्रीकांचना रमेश यन्नम - भाजप
१८ ब - राजश्री शिवशंकर दोडमनी - भाजप
१८ क - प्रशांत अनिल पल्ली - भाजप
१८ ड - शिवानंद सिद्रामप्पा पाटील - भाजप
प्रभाग १९
१९ अ - कविता हिरालाल गज्जम - भाजप
१९ ब - व्यंकटेश चंद्रय्या कोंडी - भाजप
१९ क - कलावती आनंद गदगे - भाजप
१९ ड - बसवराज रामण्णा केंगनाळकर - भाजप
प्रभाग २० (एमआयएम)
२० अ - सफिया चौधरी - MIM
२० ब - अनिसा मोगल - एमआयएम
२० क - अजहर हुंडेकरी - एमआयएम
२० ड - अझरद्दीन जहागीरदार - एमआयएम
प्रभाग २१
२१ अ - संगीता शिवाजी जाधव - भाजप
२१ ब - शिवाजी उत्तमराव वाघमोडे - भाजप
२१ क - मंजेरी संकेत किल्लेदार - भाजप
२१ ड - सात्विक प्रशांत बडवे - भाजप
प्रभाग २२
२२ अ - दत्तात्रय मरगु नडगिरी - भाजप
२२ ब - अंबिका नागेश गायकवाड - भाजप
२२ क - चैत्राली शिवराज गायकवाड - भाजप
२२ ड - किसन लक्ष्मण जाधव - भाजप
प्रभाग २३
२३ अ - सत्यजित सुबोध वाघमोडे - भाजप
२३ ब - आरती अक्षय वाकसे - भाजप
२३ क - ज्ञानेश्वरी महेश देवकर - भाजप
२३ ड - राजशेखर मल्लिकार्जुन पाटील - भाजप
प्रभाग २४
२४ अ - मधुसूदन दिनेश जंगम - भाजप
२४ ब - वनिता संतोष पाटील - भाजप
२४ क - अश्विनी मोहन चव्हाण - भाजप
२४ ड - नरेंद्र गोविंद काळे - भाजप
प्रभाग २५
२५ अ - सुमन जीवन चाबुकस्वार - भाजप
२५ ब - वैभव हत्तुरे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
२५ क - वैशाली अनिल भोपळे - भाजप
प्रभाग २६
२६ अ - संगीता शंकर जाधव - भाजप
२६ ब - दीपक विजय जमादार - भाजप
२६ क - जयकुमार ब्रम्हदेव माने - भाजप.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय वातावरणात व यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सर्व मतदार,उमेदवार,निवडणूक कर्मचारी, पोलीस प्रशासन,माध्यम प्रतिनिधी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.
लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी दाखवलेला सहभाग आणि सहकार्य यामुळे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली,असेही डॉ. ओम्बासे यांनी नमूद केले. विजय झालेले उमेदवार याची सम्पूर्ण माहिती सोलापूर महानगर पालिकेच्या https://electionresult.solapurcorporation.org/online.aspx
वेब साईट वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
