सोलापूर : सोलापूर महानगर पालिका निवडणूक २०२५ चे अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध मध निर्मीती,विक्की व वाहतुक करणाऱ्या इसमांवर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहिम घेवून कारवाई करणे संदर्भात मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने १) दिनांक ०९/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडील सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनिय माहीतीच्या आधारे सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील भीजे कवठे येथील इसम कुमार ऊर्फ बाबु पांडुरंग चव्हाण रा.मोजण्या तांडा, ता. उत्तर सोलापूर यांचे शेतात सुरू असलेल्या गुळमिश्रीत अवैध हातमट्टी दारू गाळण्याच्या भट्टीवर छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये एकूण १२८५ लीटर गुळमिश्रील रसायन व ८० लीटर तयार केलेली हातभट्टी दारु असा एकूण ५२,९७५/- रु. किमतीचा मुद्देमाल जागीच नाश केला आहे. सदर कारवाईमध्ये इराम नामे १) संजय गोपीचंद राठोड, २) कुमार ऊर्फ बानु पांडुरंग चव्हाण व ३) प्रियंका कुमार चव्हाण सर्व रा. भोजप्पा तांडा, ता. उत्तर सोलापूर यांचे विरुध्द सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
२) दिनांक १२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडील सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनिय बातमीदारामार्फत हॉटेल अॅम्बेसिडबर ते प्रमाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर इसम नामे अमोल बाळासाहेब भोसले हा विविध देशी विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या बाळगुन विक्री करण्याकरीता घेवुन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करुन एकूण १,०३,६६०/- रूपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या व एक दुचाकी मोटर सायकल जप्त करण्यात आली असून,इसम नामे अमोल बाळासाहेब भोसले रा.मु.पो.कोळी ता.उत्तर सोलापूर याचे विरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
३) दिनांक १२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडील पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना गोपनिय बातमीदारामार्फत गांधीनगर,अक्कलकोट रोड परीसरात इसम नागे नरेंद्र रामलू कोंडा हा विविध देशी विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या ऑटो रिक्षमधून विक्री करण्याकरीता घेवुन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करुन एकूण १.३२,५००/- रुपये किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून,इसम नामे नरेंद्र रामलु कोंडा रा.गांधीनगर,हनुमान मंदिराजवळ, अक्कलकोट रोड,सोलापूर याचे विरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४) दिनांक १२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडील सपोनि शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक यांना गोपनिय बातमीदारामार्फत कर्णीक नगर येथील स्वतंत्र्य सैनिक रिक्षास्टॉपजवळ इसम नामे संदिप विष्णू शिंदे हा विविध देशी विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या बाळगुन विक्री करण्याकरीता घेवुन जात असल्याची माहीती प्राप्त झाली.
त्याअनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करुन एकूण १,१२,८८०/- रुपये किमतीच्या देशी विदेशी दारुच्या चाटल्या व एक मोटर सायकल जप्त करण्यात आली असून,इसम नाने संदिप विष्णू शिंदे रा.मु.पो.दहिटणे,सोलापूर व गोल्ड वाईन शीप,अशोक चौक,सोलापूरचे मालक यांचे विरुध्द जेलरोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी एम.राज कुमार,पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ.अश्वीनी पाटील,पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने,सहा.पोलीस आयुक्त गुन्हे,अरविंद माने,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा,यांचे मार्गदर्शनाखाली,स.पो.नि. शंकर धायगुडे,शैलेश खेडकर,पोसई मुकेश गायकवाड त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
