शेतकरी संघटनेच्या जिल्हा प्रमुखपदी गिरमला धर्मण्णा गुरव यांची नियुक्ती
सोलापूर : दक्षिण सोलापूर शेतकऱ्यांचा आवाज सोशल मीडियावर प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या गिरमला धर्मण्णा गुरव (औज,ता.दक्षिण सोलापूर) यांची शेतकरी संघटनांकडून सोशल मीडिया,सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आले.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले आणि शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेतृत्व रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, "शेतीमालाला रास्त भाव" या एककलमी ध्येयासाठी सोशल मीडियावरून प्रभावी जनजागरण करण्याची जबाबदारी गुरव यांच्यावर मान्यवर यांच्या उपस्थितीत दिनांक ०१ डिसेंबर २०२५ सोमवार रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.
संघटनेने पुकारलेल्या विविध न्यायिक,राजकीय व सनदशीर आंदोलनांना योग्य प्रसिद्धी देण्याचे आवाहनही नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे. या निवडीबद्दल गिरमला गुरव यांचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.
