सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांची उदासीनता दिसत आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी माहिती देताना सांगितलं,सोलापुरात दुचाकी,चार चाकी ,तीनचाकी आणि जडवाहने मिळून एकूण 9 लाख 15 हजार वाहने आहेत.त्यापैकी फक्त 2 लाख 15 हजार 704 वाहन धारकांनी एसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली आहे.शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 च्या अगोदर असलेल्या सर्व वाहनांना एसआरपी नंबर प्लेट बसवून घेणे अनिवार्य केले आहे.आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरात 1 एप्रिल 2019 च्या वाहनांची एकूण संख्या 9 लाखाच्या वर आहे.त्यामधील फक्त 2 लाख वाहनधारकांनी एसआरपी नंबर प्लेट बसवून घेत आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी नोंद केली आहे.राज्य शासनाने आजतागायत चार वेळा मुदतवाढ दिली आहे.यंदा 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली नाही तर एसएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर एक हजार रुपये दंड ऑनलाइन रित्या आकारला जाणार आहे.
पाचव्यांदा मुदतवाढ तरीही वाहनधारकांची उदासीनता - महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. सोलापुरात वाहनधारकांची उदासीनता दिसत आहे.1 एप्रिल 2019च्या अगोदरची 7 लाख वाहन धारकांनी उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली नाही.परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे,शासनाने 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे,त्यापूर्वी वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून घ्यावे.
