सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी महिलांनी आणि पुरुषांनी प्रचार यंत्रणेत घेतलेला सहभाग खरोखरच प्रेरणादायी आहे. संघर्ष,समर्पण आणि विकासाच्या दृढ निश्चयातून निर्माण झालेला हा उत्साह निश्चितच विजयाच्या दिशेने जाणारा आहे.
या निवडणुकीत भाजप उमेदवारांनी सर्वांगिण विकासाचा ठोस आराखडा सादर करत जनतेचा विश्वास जिंकला आहे. शहरातील रस्ते,पाणी,स्वच्छता,शिक्षण अशा मूलभूत सुविधांमध्ये झालेली प्रगती आणि नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे मैंदर्गीचा विकास वेगाने पुढे जात आहे.
कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम,जनतेचा उमेदवारांप्रती असलेला विश्वास आणि महिलांच्या शक्तीने मिळून आजचा दिवस परिवर्तनाच्या दिशेने ठाम पाऊल टाकणारा ठरत आहे.
