Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीची केली पाहणी


मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथील आयोजित कार्यक्रमांची तयारी सुरळीत व्हावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.



    
डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला लाखो अनुयायी भेट देतात. त्यामुळे नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुरक्षित पार पडावेत यासाठी उपाध्यक्ष बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान स्वच्छता,पिण्याचे पाणी,वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्थापन,पार्किंग,सुरक्षा व्यवस्था,दिव्यांगांसाठी सुविधा तसेच गर्दी नियंत्रण उपायांची सविस्तर तपासणी करण्यात आली. अधिकारी व स्थानिक प्रशासनाला समन्वय साधून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.





यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, “महापरिनिर्वाण दिन हा देशाच्या सामाजिक आणि मानवतावादी विचारांचा अंगीकार करण्याचा दिवस आहे. अनुयायांना सुलभतेने दर्शन व कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे,ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

या पाहणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे उद्योजक तुकाराम गायकवाड संबंधित विभागांचे अधिकारी,पोलिस विभाग,मनपा प्रशासनाचे कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.